आष्टी : सरकारकडून सामान्य जनतेवर अन्याय होत असून याच्या निषेधार्थ २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर हल्लाबोल आंदोलन केले जात आहेत. कडा ते आष्टी दुचाकी रॅली काढत आष्टी तहसील कार्यालयावरही रविवारी राकॉच्यावतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे, ओबीसी सेलचे प्रदेशउपाध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, काकासाहेब शिंदे, किशोर हंबर्डे, सुनील नाथ, सुनील गाडे, संदीप आस्वर, रघूनाथ आवारे, शिवाजी नाकाडे, भाऊसाहेब घुले, जगन्नाथ ढोबळे, जालिंदर वांढरे, पोपट गर्जे, अकील सय्यद, दादासाहेब गव्हाणे, निळकंठ सुंबरे, विकास कदम, महेश चौरे, संदीप सुंबरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले.
राज्य व केंद्र शासनाने आजपर्यंत फक्त शेतकºयांना ओलीस धरले आहे. राष्ट्रवादीने दिलेल्या मागण्यांचा विचार केला नाही तर ह्या आंदोलनाची दिशा तीव करुन शासन व प्रशासनास लोकहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडू, असे जि. प. सदस्य बाळासाहेब आजबे यांनी सांगितले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांना देण्यात आले. मोर्चाचे सूत्रसंचालन दादासाहेब गव्हाणे यांनी केले.राष्ट्रवादीच्या मोर्चात भाजपची घोषणा...राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी निवेदन तहसीलदारांना दिल्यानंतर नुकतेच राष्ट्रवादीत गेलेल्या बाळासाहेब आजबे यांनी भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशी घोषणा देताच एकच हशा पिकला. यावेळी आजबे यांनी गेली पंचवीस वर्ष आपण एवढच काम इमाने इतबारे केले असल्याचे सांगत या विषयावर पडदा टाकला.