आष्टी तालुका हगणदारीमुक्त झाल्याचा डांगोरा पिटणारे प्रशासन कागदोपत्रीच दाखवत असले तरी प्रत्यक्षात गावोगाव परिस्थितीत मात्र वेगळीच आहे. तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या १७७ गावांत प्रशासनाने हगणदारीमुक्त गावात आपले स्वागत असल्याचे फलक लावले असले तरी आजही गावात येता-जाता वास्तव दिसून येत. त्यामुळे लोटा बहाद्दरांची संख्खा आहे तीच आहे. प्रशासनाने हगणदारीमुक्त गाव करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले असले तरी त्या गावात मात्र नाकाला रुमाल लावून जावे लागत आहे. त्यामुळे कागदोपत्री हगणदारीमुक्त गावाचा डांगोरा पिटणाऱ्या तालुक्याची वरिष्ठ समिती नेमून चौकशी करावी व यात हलगर्जीपणा करत असलेले अधिकारी, कर्मचारी याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
घरोघरी शौचालय बांधा, उघड्यावर जाणे टाळा हे ब्रीद वाक्य कशाला?
आष्टी पंचायत समितींतर्गत गावोगाव जरी शौचालय बांधले असले तरी याचा वापर टाकावू वस्तू, अंघोळ व सरपण ठेवण्यासाठी केला जात आहे. मग याचा वापर कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
याबाबत आष्टी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, हगणदारीमुक्त गावासाठी दुर्लक्ष करत असलेल्या ग्रामसेवक, सरपंच यांना बोलून आदेशित करतो, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
२०१८ ला कागदोपत्री हगणदारीमुक्त
स्वच्छ भारत अभियानातून २०१८ रोजी आष्टी तालुक्यातील प्रत्येक गावात आपले... या हगणदारीमुक्त गावात संघर्ष स्वागत असे फलक लावले; पण प्रत्यक्षात मात्र घाणच घाण असल्याचे दिसून येत आहे.
220721\20210722_083114_14.jpg