आष्टी तालुक्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या अनुषंगाने अटकाव करण्यासाठी आरोग्य, विभाग महसूल प्रशासन, नगरपंचायत, पंचायत समिती यासह विविध अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत आहेत. जनतेला आवाहनही करत आहेत. तरीदेखील नागरिक प्रशासनाला कसलेच सहकार्य करत नसल्याने हा आकडा वाढत चालला आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वेळोवेळी होत असतानाही तसेच तहसीलदारांनी आजपर्यंत दोन बैठका घेऊनदेखील कसल्याच प्रकारे नागरिक या आवाहनाला जुमानत नसल्याचे समोर आले आहे. सहा दिवसांत तब्बल १७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याला अटक करण्यासाठी प्रशासनाच्या नाकीनऊ आले असून नागरिक बेफिकीरपणे वागत आहेत. कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होऊ शकते, त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळावेत, असे आवाहनही महसूल आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आष्टीकरांची धाकधूक वाढली ; सहा दिवसांत १७ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:46 AM