प्रतीक्षा तवले ९९.४० टक्के आणि भाग्यश्री झाडे ९९.४० टक्के मिळवून प्रशालेमधून सर्वप्रथम आल्या आहेत. प्रतीक्षा गिते ९८.८० टक्के, तर सृष्टी गिते ९८.४० टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय आल्या आहेत. साक्षी केरूळकर आणि सेजल वराट या दोघींनाही ९७.६० टक्के, तर ऋतुजा माने हिला ९६.४० टक्के गुण मिळाले आहेत. विशेष गुणवत्तेसह प्रियंका जंपलवार, प्रियंका रेडेकर, आनम शेख, कार्तिकी जाधव, साक्षी फड, रोहिणी पवळ, पूनम सानप, वैष्णवी पोकळे, साक्षी बळे, श्रुती जाधव, श्रुती पोकळे, वैष्णवी धनवडे, ऋतुजा भोगाडे, स्नेहल डिसले, दीक्षा कदम इत्यादी विद्यार्थिनींनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत.
एकूण २५ विद्यार्थिनींनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असून एसएससी परीक्षेत जिल्हा परिषद कन्या प्रशालेने बाजी मारली आहे. या यशाबद्दल सर्व शिक्षक, शिक्षिका, सर्व लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ.रिजवाना नदीम शेख, शा.व्य. सदस्य प्रा. लक्ष्मण रेडेकर तसेच समितीचे सर्व सदस्य, गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, मुख्याध्यापक आबासाहेब खताळ, मुख्याध्यापक सुरेश पवार, केंद्रप्रमुख त्रिंबक दिंडे, संदीप सुंबरे आदींनी कौतुक केले.
190721\img-20210719-wa0346_14.jpg