अविनाश कदम
आष्टी : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ३० डिसेंबरपर्यंत ८४ जागांसाठी ३३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ३१९ उमेदवारी अर्ज पात्र तर १२ उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. चार जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
आष्टी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी जाहीर झाल्या असून, सरपंच पदाचे आरक्षण गुलदस्त्यात असल्याने निवडून येणाऱ्या सदस्यांपैकी कोणा एकाची सरपंच पदी वर्णी लागू शकते त्यामुळे आपण सरपंच होणार या आशेने अनेक उमेदवार रिंगणात उतरले असल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. बंडाळी होण्याची शक्यता लक्षात घेत गावातील पुढारी बंडाळी होऊ नये यासाठी दिवस-रात्र मनधरणी करत आहेत.
बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दोन ते तीन पॅनल पडण्याची शक्यता वर्तवली जात असून, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे.
या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक
आष्टी तालुक्यातील हातोला, डोईठाण,
धनगरवाडी (डो), कऱ्हेवाडी, क-हेवडगाव,
सोलापुरवाडी, खुटेफळ पुंडी, पिंपळा, सुंबेवाडी,
धनगरवाडी (पिंपळा) व वटणवाडी आश्या एकूण १२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ८१ ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी ३३१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज छानणीत १२ अर्ज अवैध तर ३१९ अर्ज वैध ठरले आहेत. तर अर्ज मागे घेण्यासाठी ४ जानेवारी पर्यंत मुदत असून पहिल्या दिवशी एक उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. - शारदा दळवी,
तहसीलदार आष्टी