लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आष्टी पोलिसांच्या ताब्यातून अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केले. त्यानंतर पीडितेने आपल्याला या आरोपीपासून धोका असून संरक्षण देण्याची मागणी केली होती. एवढे गंभीर प्रकरण असतानाही आष्टी पोलिसांकडून अद्यापही पीडितेला संरक्षण देण्यात आलेले नाही. उलट तिच्या भावाला अरेरावी केली. अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात आष्टी पोलिसांकडून हलगर्जी होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे एका १९ वर्षीय तरूणीला चाकुचा धाक दाखवून गावातीलच सुनिल डुकरे याने अत्याचार केला होता. ही घटना ३ जून रोजी घडली होती. त्यानंतर आष्टी पोलिसांनी सुनिलला चौकशीसाठी म्हणून ठाण्यात आणले. येथे त्याने आष्टी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. विशेष हा सर्व प्रकार त्यांनी वरिष्ठांपासून लपविला. आता या प्रकरणाला आठवडा उलटूनही अद्याप आरोपीला अटक झालेली नाही. दरम्यान, सुनिल हा फरार असल्याने सुडबुद्धीने तो आपल्यावर हल्ला करेल, याची भिती असल्याने पीडितेच्या भावाने आष्टी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली. मात्र, याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, पीडिता व कुटुंब हे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘एएसपीं’नी घेतली गंभीर दखलआरोपी चौकशीसाठी आणल्यानंतर त्याने ठाण्यातून पलायन केल्याचा प्रकार आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे आणि पोलीस निरीक्षक माधव सुर्यवंशी यांनी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यापासून लपविला होता. त्यांना याची कुणकुण लागताच त्यांनी चांगलेच खडसावले. शिवाय संबंधित कर्मचाऱ्यांचा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. ‘लोकमत’च्या वृत्ताची विजय कबाडे यांनी गंभीर दखल घेतली होती.‘त्या’ दोन कर्मचाऱ्यांची होणार चौकशीठाण्यातून पलायन करतावेळी ज्या कर्मचाºयांवर सुनिलला सांभाळण्याची जबाबदारी होती, त्यांनी कर्तव्यात हलगर्जी केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचा अहवाल मागवून प्रकरणाची चौकशी करण्यासह संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.या चुकांवर ठेवले बोट४फिर्यादीत पीडितेचे वय १७ वर्षे असून स्ट्राँग रिपोर्टमध्ये १९ आहे. आरोपीला ताब्यात घेऊन ठाण्यात आणल्यानंतर त्याची नोंद ठाण्याच्या डायरीत घेतली नाही. पलायन केल्यावर त्याला चौकशीसाठी आणल्याचा कांगावा केला. मात्र, हा सर्व प्रकार ठाण्यातील कॅमेºयात कैद झाला. आरोपीपासून पीडितेच्या जिवीताला धोका असतानाही संरक्षण दिले नाही. तसेच आरोपीला सुद्धा धोका असताना त्याला तात्काळ अटक करण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे.
आरोपीकडून अत्याचार; पोलिसांकडून अन्याय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 11:52 PM
आष्टी पोलिसांच्या ताब्यातून अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केले. त्यानंतर पीडितेने आपल्याला या आरोपीपासून धोका असून संरक्षण देण्याची मागणी केली होती. एवढे गंभीर प्रकरण असतानाही आष्टी पोलिसांकडून अद्यापही पीडितेला संरक्षण देण्यात आलेले नाही.
ठळक मुद्देतपासात हलगर्जी : आष्टी पोलिसांच्या हातून पळालेल्या आरोपीपासून धोका असतानाही पीडितेला संरक्षण नाही