तालुक्यातील लाडेवडगाव येथे गायरान जमिनीतील उभ्या पिकांची नासधूस केल्याचा प्रकार ९ सप्टेंबर रोजी घडला. यावरुन २५ जणांवर युसूफवडगाव ठाण्यात ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला.
लाडेगाव येथील २१ जण सर्व्हे क्र. १४३ मधील गायरान जमीन गेल्या ३० वर्षांपासून कसत आहेत; मात्र या जमिनीच्या मालकी हक्कावरुन वाद आहे. जमीन कसणाऱ्यांनी जूनमध्ये सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, तूर आदी पिकांची पेरणी केली. पिके जोमात आली; मात्र ९ सप्टेंबर रोजी गावातीलच २५ जणांनी एकत्रित येऊन
उभ्या पिकांत रोटर, जेसीबी फिरवून उभ्या पिकाची नासाडी केली. त्यामुळे अतोनात नुकसान झाले.
रावसाहेब एकनाथ घिरे यांच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव ठाण्यात २५ जणांविरुद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.