शेतातून ट्रॅक्टर जाऊ न दिल्याच्या रागातून विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी तालुक्यातील चिंचपूर येथे घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून युसूफवडगाव ठाण्यात गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.
चिंचपूर येथील पीडित महिलेच्या शेतात
संदीपान विश्वनाथ चौरे याने ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.यास पीडितेने विरोध केल्याचा राग मनात धरून संदीपान विश्वनाथ चौरे याने ती घरी एकटी असल्याची संधी साधून २२ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता घरात घुसून बळजबरीने अत्याचार केला. पीडित महिलेने विरोध केला असता संदीपान चौरे याने तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने दिरास याबाबत माहिती दिली. त्यामुळे दिरास तू या बाबत का सांगितले म्हणून संदीपानाचा भाऊ सुखदेव चौरे व वडील विश्वनाथ चौरे यांनी त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता तिला व तिच्या पतीला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.२२ ऑगस्ट रोजी केज पोलीस ठाण्यात संदीपान चौरे, सुखदेव चौरे व विश्वनाथ चौरे यांच्याविरुद्ध बलात्कार, मारहाण व धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे व सहकाऱ्यांनी संदीपान चौरे यास ताब्यात घेतले. दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी युसूफवडगाव पोलिसांनी त्याला केज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती
उपनिरीक्षक सीमाली कोळी करीत आहेत.