पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय मुलगी शहरात राहते. दोन वर्षांपूर्वी तिची स्वप्नील भाऊसाहेब शिंदे (२७, रा. श्रीरामनगर, बीड) याच्याशी जुलै २०१९ मध्ये ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत स्वप्नीलने तिच्याशी भेटीगाठी वाढवत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जुलै २०१९ ते मार्च २०२० या दरम्यान वेळोवेळी तिच्यावर पंचायत समिती परिसर तसेच मांजरसुंबा येथील एका हॉटेलात बळजबरीने अत्याचार केला. दरम्यान, १४ व १५ सप्टेंबर २०२१ रोजी स्वप्नील शिंदे याने पीडितेच्या घरासमोर जाऊन गोंधळ घातला. आरडाओरड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबीयांनी शिवाजीनगर ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला.
...
तीन दिवसांची पोलीस कोठडी
स्वप्नील शिंदे यास १५ सप्टेंबर रोजी रात्री शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास १६ रोजी न्यायालयात हजर केले असता, १८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक मीना तुपे यांनी दिली.
.....