लोकमत न्यूज नेटवर्कबीड/अंबाजोगाई : येथील कारागृहात बंदिस्त असलेला सराईत गुन्हेगार मोहन मुंडे (रा. अंबाजोगाई) याने नातेवाईकांना भेटू दिले नाही म्हणून शौचालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडली. यापूर्वीही त्याने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर राज्यासह परराज्यात चोरी, दरोडा, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मोहन मुंडे हा बालवयातच गुन्हेगारीकडे वळला. सुरुवातीलाच त्याने अंबाजोगाईसह परिसरात गुन्हे केले. त्यानंतर त्याने परराज्यातही गुन्हे केले. या प्रकरणी त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. अशातच मागील दीड वर्षांपूर्वी पुण्यात त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. यासह अन्य काही गुन्ह्यांमध्ये तो बीडच्या कारागृहात बीड कारागृहात बंदिस्त होता.
सोमवारी रात्रीच्या सुमारास तो शौचासाठी गेला असता अज्ञात वस्तूने त्याने स्वत:च्या अंगावर वार करून घेतले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दोन वेळेस पलायनमोहन हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांना कसा चकवा द्यायचा, याबाबत तो ज्ञात आहे. चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेने त्याला चार वर्षांपूर्वी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याने हातकडीसहित पलायन केले. त्यानंतर अंबाजोगाई ठाण्यातूनही त्याने गुटख्याच्या पुडीने हातकडी उघडून पळ काढला होता. त्याची अंबाजोगाई शहरात दहशत निर्माण झाली होती. तसेच ज्या पोलीस कर्मचाºयाने त्याला पकडले त्याच्यावर तो वेगवेगळे आरोप करून ब्लॅकमेल करीत असल्याचे विश्वसनीय पोलीस सूत्रांनी सांगितले.