बीड : येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने भिंतीवर डोके आपटून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.मिळालेल्या माहितीनुसार जिजा लालासिंग राठोड असे या कैद्याचे नाव आहे. त्याला सध्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बरॅॅक क्रमांक ५ मध्ये ठेवलेले होते. सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्याने बरॅक क्र.४ मध्ये जावून स्वत:चे डोके कारागृहाच्या भिंतीवर आपटून घेतले. शिवाय शुगर कमी होण्यासाठी वापरल्या जाणाºया चार गोळ्याही खाल्ल्या. हा सर्व प्रकार कारागृह रक्षक जगन्नाथ जैवाळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यास त्यांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी कैद्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोहेकॉ. अंबादास औसरमल तपास करत आहेत.
बीड जिल्हा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:16 AM