लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : शहरातील कोल्हेर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न असफल ठरला. चोरट्यांनी बँकेचे कुलूप तोडून कृषी विभागाच्या काउंटरची काच फोडली. तेथील कागदपत्रांची उचकापाचक केली. तर बँक शेजारील सहा दुकाने फोडून सुमारे १५ ते २० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली.
गेवराई शहरातील कोल्हेर रोडवर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. या बँकेच्या तळघरात असलेल्या बँकेच्या कृषी विभागातील शटरचे अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी रोजी पहाटे ४ ते ५ च्या सुमारास कुलूप तोडले. बँकेच्या आतील काउंटरची काच फोडली. तेथील कागदपत्राची उचकापाचक केली. परिसरात असलेले किराणा दुकानांसह इतर पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. या दुकानाच्या गल्ल्यातील जवळपास १५ ते २० हजारांची रोकड लंपास केली. यात माउली कलेक्शन, अक्षता किराणा, माऊली किराणा, एका मेडिकल सह इतर दोन दुकानांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, या घटनेेने नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
....
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात
गेवराई शहरात कोल्हेर रोडवर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. बँकेचे दुसऱ्या मजल्यावर मुख्य कार्यालय आहे. तर खाली तळघरात बँकेचे कृषी विभाग आहे. मात्र याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेेले नाहीत. दरम्यान, परिसरात एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये एक जण कैद झाला आहे. ही व्यक्ती रात्री कशासाठी फिरत आहे. याचा तपास पोलीस घेत आहेत. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
.....बँकेची तिजोरी सुरक्षित
जिल्हा सहकारी मुख्य कार्यालय वरच्या मजल्यावर आहे. त्या ठिकाणी तिजोरी आहे. मात्र याठिकाणी चोरट्यांनी काहीही केले नाही. चोरट्यांनी खालच्या मजल्यावरील कृषी विभागाच्या काउंटरची काच फोडली आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत, असे बँकेचे शाखाधिकारी संदीप गरड यांनी सांगितले.
....
090721\sakharam shinde_img-20210709-wa0015_14.jpg~090721\20210709_133104_14.jpg