बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या कक्षासमोर सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी विषारी द्रव प्राशन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी धाव घेत त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. तक्रार केली म्हणून आपल्याला धमकावल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
चार दिवसांपूर्वी दीपक थोरात यांनी जिल्हा रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शनच्या अफरातफर झाल्याचा आरोप करीत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी दोन कार्यकर्त्यांनी थोरात यांना धमकावले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता. माझ्या अंगावर माणसे का पाठवतात, असे म्हणत थोरात यांनी सोमवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांना त्यांना अडविले आणि रुग्णालयात दाखल केले.
..
धमकी प्रकरणाबाबत मला काहीच माहिती नाही. झालेले आरोप खोटे आहेत.
-डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.
===Photopath===
260421\26_2_bed_3_26042021_14.jpg
===Caption===
एसीएस डॉ.सुखदेव राठोड यांच्या कक्षासमोर आत्मदहन करणारे दीपक थोरात यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.