लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मागील गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. शुक्रवारी सकाळी बँक उघडण्यास गेल्यानंतर ही घटना लक्षात आली. या प्रकरणी बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी धारूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.धारूर शहरातील तेलगाव रस्त्यावर असणाºया भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे कर्मचारी दैनंदिन काम उरकून गुरुवारी रात्री घरी गेले. त्यानंतर रात्री उशिरा बँकेचे मागील लोखंडी गेटचे कुलूप तोडून लाकडी दरवाजा उचकवून अज्ञात चोर्यांनी आत प्रवेश करून केला. मात्र, आतून लोखंडी शटर असल्याने चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. सकाळी बँक उघडण्यास गेले असता मागचे गेटचे कुलूप तोडलेले व दरवाजा उचकल्याचे आढळून आले.या प्रकरणी बँकेचे शाखाधिकारी मिलिंद रोठे यांनी धारूर पोलीस स्टेशनला तक्र ार दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. शहरातील मध्यवस्तीत असणारी बँक फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे हे करीत आहेत.
धारूरमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 11:50 PM