शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

जप्त केलेल्या वाळूसाठ्याचा लिलाव संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:55 AM

वाळू साठा जिल्हाधिकारी कार्यालयात साठवण्यात आला होता. त्याचा लिलाव करण्यात आला. मात्र, या प्रक्रियेमध्ये तहसीलदार सचिन खाडे यांनी स्वाक्षरीच केली नसल्याचे समोर आले आहे.

प्रभात बुडूख।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा प्रशासनाने बीड शहरालगत मोठा वाळू साठा जप्त केला होता. तो सर्व वाळू साठा जिल्हाधिकारी कार्यालयात साठवण्यात आला होता. त्याचा लिलाव ७ डिसेंबर रोजी करण्यात आला. मात्र, या प्रक्रियेमध्ये असलेल्या कागदपत्रावर तहसीलदार सचिन खाडे यांनी स्वाक्षरीच केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा लिलाव कोणाच्या फायद्यासाठी केला. यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाला आहे का, असे प्रश्न उपस्थित होऊन तहसीलदार खाडे यांनी केलेला लिलाव हा संशयाच्या भोव-यात सापडला आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हाभरात अवैध वाळू साठ्यावर कारवाई करत तो वाळू साठा जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवला आहे. यातील अंदाजे १६५ ब्रास वाळू साठ्याचा लिलाव ७ डिसेंबर रोजी केल्याची माहिती आहे. कोणत्याही प्रकारचा लिलाव करण्यासाठी जाहीर प्रकटन किंवा प्रसारमाध्यमातून जाहिरात देणे बंधनकारक आहे. मात्र, त्याची तसदी न घेता ७ डिसेंबर रोजी लिलाव प्रक्रिया घाई गरबडीमध्ये उरकरण्यात आली. विशेष बाब म्हणजे तहसीलदार खाडे यांनी ज्या वाळूसाठ्याची बाजारभावाप्रमाणे किंमत १५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. परंतु, १६५ ब्रास वाळू साठ्याचा लिलाव हा केवळ ४ लाख ५३ हजार ७५० रुपये एवढ्या कमी किंमतीत केला. ही लिलाव प्रकिया पूर्ण झाली आहे, परंतु गंभीर बाब म्हणजे यावर तहसीलदार सचिन खाडे यांची स्वाक्षरी नाही. तसेच इतर संबंधित अधिका-याची देखील स्वाक्षरी नाही. हा गैरप्रकार काही वाळू ठेकेदारांच्या लक्षात आला. या लिलावात बनाव करण्यात आला असून आर्थिक व्यावहरातून हा लिलाव केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच जाब विचारण्यासाठी तहसील कार्यालयात ठेकेदार बसले होते. यावेळी आपण यात त्रुटी असतील तर फेरलिलाव करू असे खाडे यांनी सांगितले. मात्र, हा गैरप्रकार असून वरिष्ठांनी याची दखल घेऊन चौकशी करावी व तहसीलदार तसेच या लिलाव प्रक्रियेसंबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वाळू ठेकेदारांनी केली आहे.७ तारखेच्या लिलावाचे जाहीर प्रगटन नाहीतहसीलच्या इमारतीमध्ये माहिती फलकावर वाळूच्या लिलावासंदर्भात जाहीर प्रगटन लावण्यात येते. या ठिकाणी २५ तारखेचे व ३० तारखेला या वाळूचा लिलाव करण्यात येईल असे जाहीर प्रगटन लावलेले दिसत आहे. परंतु, ७ डिसेंबर रोजी लिलाव करण्यात येईल, हे प्रगटन लावलेले नाही. तसेच या लिलावात सहभागी होणा-याचा वाळूच्या संदर्भात कुठलाही व्यवसाय किंवा संबंध नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ‘मॅनेज लिलाव’ होता असा आरोप वाळू ठेकेदारांनी केला आहे.

टॅग्स :sandवाळूRevenue Departmentमहसूल विभागTahasildarतहसीलदार