लोकमत न्यूज नेटवर्कबीड : औरंगाबाद परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते. या स्पर्धेची सुरुवात २१ सप्टेंबरपासून करण्यात आली आहे. यावेळी औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड व उस्मानाबाद या विभागातील पोलीस कर्मचारी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा समारोप २५ सप्टेंबर रोजी बीड येथे होणार आहे. यावेळी परिक्षेत्रातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अंबाजोगाई पोलीस उपाधीक्षक राहुल धस, पोउपनि. विलास हजारे, यांची यावेळी उपस्थिती होती. पुढे बोलताना पोद्दार म्हणाले या पाच ठिकाणच्या क्रीडा स्पर्धा बीडमध्ये होत आहेत. ही आमच्यासाठी स्वागतार्ह बाब आहे, या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची योग्य पद्धतिने सोय करण्यात आलेली आहे. यावेळी येथील पोलीस मुख्यालय क्रीडांगण, सैनिकी मैदान, व क्रीडा संकुल याठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धांमध्ये ५ ठिकाणावरून ४७२ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये फुटबॉल, हॉलीबॉल, हॉकी, कबडी, खो-खो, बास्केटबॉल सात सांघीक खेळांचे प्रकार आहेत. तसेच अॅथलॅटिक्स प्रकारात गोळा फेक, भालाफेक, थाळीफेक, लांब उडी, तिहेरी उडी, उंज उडी, धावणे १०० मी, २०० मी, ४०० मी, ८०० मी, १५०० मी, ५ हजार मीटर, व १० हजार तसेच क्रॉस कंन्ट्री, कुस्ती, ज्यूदो, तायकवांदो, वेट लिफ्ंिटग, बॉक्ंिसग, स्विमिंग या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा गुणांकन पद्धतने खेळवल्या जातात, तसेच या स्पर्धांमधून उत्कृष्ट संघाची निवड राज्य पोलीस खेळांसाठी निवडली जाते. या स्पर्धा उत्साहात सुरु असून यासाठी ७० पंचांची नेमणूक केली आहे.या स्पर्धेचा समारोप २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलीस आयुक्त, तसेच बीड, उस्मानाबाद, जालना औरंगाबाद ग्रामीमचे पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी विजेत्या संघांना व स्पर्धकांना ट्रॉफी, मेडल, व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीड पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. ते परिश्रम घेत आहेत.
औरंगाबाद परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा बीडमध्ये उद्या समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:33 AM