लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. अधिकाऱ्यांनी फक्त पाहणी न करता त्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना कराव्यात. अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी सरसकट नुकसानीचे पंचनामे करावेत. रस्ते, पुलाची पाहणी करून तत्काळ दुरुस्ती करावी, अशा सूचना आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी दिल्या.
आष्टी तहसील कार्यालयात सोमवारी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आष्टी, पाटोदा, शिरूरकासार तालुक्यातील सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे बोलत होते.
या बैठकीत डॉ. शिवाजी राऊत, तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, नीलिमा थेऊरकर, अशोक खेडकर, लोकरे साहेब, उपअभियंता काकडे, पालवणकर, पी. ई. तळेकर, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, उपविभागीय अभियंता माळी, एस.डी.मुंढे, डी. पी. जाधव, एम. के. कुलकर्णी, भाऊसाहेब घुले, सुधीर जगताप, संदीप अस्वर, बबन रांजणे, सिद्देशर झांजे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.