बीड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली.
पवार यांना मात्र पोस्टींग देण्यात आलेली नव्हती. दाेन वर्षाच्या कार्यकाळात अजित पवार जवळपास दीड वर्षे प्रशासक राहिले. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलजीवन योजनेतील गैरप्रकारांमुळे ते वादग्रस्त ठरले. त्यांच्या कार्यकाळात शिक्षक बदलीदरम्यान दिव्यांग शिक्षकांच्या टक्केवारीतील फरकाचा मुद्दा गाजला. न्यायालयाच्या निर्देशानंतर शिक्षकांचे निलंबन रद्द करावे लागले होते. नुतन सीईओ पाठक शनिवारी किंवा सोमवारी रूजू होतील, असे मानले जात आहे.