ठळक मुद्देबीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांना पाच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. कांबळे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपीक महादेव महाकुंडे यांनाही अटक करण्यात आली.पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी पाच लाखांची मागणी केली होती.
बीड - बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांना शनिवारी (2 फेब्रुवारी) पाच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. कांबळे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपीक महादेव महाकुंडे यांनाही अटक करण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी पाच लाखांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत माहिती मिळली होती. कांबळे यांना पाच लाखांची लाच त्यांच्या घरातूनच अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.