परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ( Gopinath Munde ) आणि प्रमोद महाजन ( Pramod Mahajan ) अंबेवेस भागातील ज्या हाॅटेलमध्ये चहा घ्यायचे आज त्याच हाॅटेलमध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankaja Munde) पोहोचल्या. त्यांनी तिथे कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत चहा घेतला. यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला.
पंकजा मुंडे आज सकाळपासुन परळी शहरात विविध भागात सांत्वनपर भेटी देत होत्या. अंबेवेस भागात आल्यानंतर त्या अचानक थेट प्रकाश खोत यांच्या म्हाळसाकांत हाॅटेलमध्ये गेल्या. खोत यांचे वडिल लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे पूर्वीपासूनचे सहकारी होते. मुंडे नेहमी या हाॅटेलमध्ये चहा घेण्यासाठी यायचे. कधीकधी तर प्रमोद महाजन सुद्धा या ठिकाणी चहा घेत. आज त्याच हाॅटेलमध्ये पंकजाताई आल्याचे पाहताच खोत आनंदित झाले. पंकजाताईंनी त्यांनी तयार केलेला चहा मागवला. यावेळी अनेक नागरिक आणि कार्यकर्ते तेथे जमले. त्यांच्यासमवेत चहाचा आस्वाद घेतांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
हेही वाचा - माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर
भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, प्रकाश जोशी, अनिल तांदळे, महादेव अप्पा इटके, नगरसेवक पवन मुंडे, नरेश पिंपळे, नितीन समशेट्टी, पवन मोदाणी, मोहन जोशी, विकास हालगे, सुशील हरंगुळे आदी यावेळी उपस्थित होते.