वडवणी : तालुक्यातील बाहेगव्हाण ग्रामपंचायतीने आर.आर.पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत वडवणी तालुक्यातील बाहेगव्हाण, चिंचवण व दुकडेगाव या तीन गावाची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. यातून बाहेगव्हाणने प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले असून ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. बीड जिल्ह्यात गाव आदर्श करण्याचा संकल्प माजी सैनिक सरपंच नंदकिशोर मस्के यांनी व्यक्त केला.
आर.आर.पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत वडवणी तालुक्यातील बाहेगव्हाण ग्रामपंचायतने उत्कृष्ट काम करून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून २०लाख रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. सन २०१९-२० या वर्षाकरता शासनाकडून आर.आर.आबा पाटील ‘सुंदर गाव पुरस्कार’ या योजनेसाठी वडवणी तालुक्यातील अनेक गावांची तालुका आणि जिल्हास्तरावर तपासणी करण्यात आली. सकारात्मक, सुधारणात्मक बदलांमुळे बाहेगव्हाणला सर्वाधिक गुण मिळाले. २०१९-२० चे वडवणी तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज म्हणून निवड झाली. यासाठी ग्रामसेवक विजय इंगळे आणि माजी सैनिक सरपंच नंदकिशोर मस्के यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. स्वच्छता, गावांतर्गत रस्ते, गावातील बायपास, रिंगरोड, शौचालय, डिजिटल अंगणवाडी, ई- लर्निंग शाळा, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, फिल्टर पाणी, कचराकुंडी,पथदिवे, ग्रामपंचायतची सर्व कामे ऑनलाइन ,रोजगार हमीचे कामे यासह विविध विकास कामांचे नियोजन करून अंमलबजावणी केली.
महिला व बालविकाससाठी असलेल्या निधीतून गावातील विधवा, परित्यक्ता महिलांना गटविकास अधिकारी मीना कांबळे यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप केले. गावातील मुलांना कुस्तीचे शिक्षण देण्यासाठी सुसज्ज व्यायामशाळा उभारली. गावात सभागृह निर्माण केले. यासाठी सरपंच, ग्रामसेवकासह उपसरपंच दिगंबर मस्के, ग्रामपंचायत सदस्य वैशाली सिद्धेश्वर मस्के, महेश जाधव, महेश फासे, अरुण चव्हाण, सुवर्णा दिलीप नागवे, हौसाबाई डांबे, विजयमाला मस्के, सोपान उजगरे इत्यादींनी आपापल्या वार्ड नुसार बैठक घेऊन योगदान दिले. तर ग्रामरोजगार सेवक भागवत मस्के, ऑपरेटर सुधीर मस्के, ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता मस्के, लक्ष्मण नागवे, आशा वर्कर आशा मोरे, अंगणवाडी कार्यकर्ती कल्पना मस्के, ज्योती लगड, भजनी मंडळी, महिला बचत गट, पोलीस पाटील शिवाजी मस्के, जिल्हा परिषद शाळा सर्व शिक्षक, गटविकास अधिकारी मीना कांबळे, विस्तार अधिकारी अशोक निरडे आणि गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.