शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

बाळासाहेब आंबेडकर पोहचले आष्टी डीवायएसपी कार्यालयाला टाळे ठोकण्यास; पोलिस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 6:10 PM

पिडीत महिलेला न्याय देऊन दोषी आरोपीला तात्काळ अटक करा- बाळासाहेब आंबेडकर 

- नितीन कांबळेकडा (बीड): आदिवासी पिडितेला न्याय देऊन आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. याप्रकरणी कारवाईत दिरंगाई होत असल्याने अॅड.आंबेडकर यांनी आज आष्टी येथील उपविभागीय पोलिस कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले याप्रसंगी ते बोलत होते.

आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणी आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नाही. यामुळे आष्टीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन आज दुपारी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. पुढे बोलताना अॅड.आंबेडकर म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग होत आहे. पीडितेने सांगितलेले आरोपी पोलिसांनी पहिल्यांदा पकडावे. मी पोलिसाच्या विरोधात नाही, फक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आहेत हे दाखवून देण्यासाठी आलो आहे. कोणत्याही महिलेला नग्न करण्याचा, व कोणाच्याही शेतातील उभे पिक नष्ट करण्याचा अधिकार कोणालाही नाही. घडलेली घटना लाजिरवाणी आहे. यामुळे या प्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करून अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी पोलिसांनी तीन दिवसांत पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले. आंदोलनात मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे,जिल्हाध्यक्ष उध्दव खाडे, प्रा.किसन चव्हाण, प्रा.अरूण जाधव, शैलेश कांबळे,बबन वडमारे, अजय सरोदे, रूपेश बोराडे, बापु आहेर,आकाश कांबळे,याच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBeedबीडPoliceपोलिस