शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याचे बँक खाते सील; ईपीएफओची मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 1:19 PM

Pankaja Munde News : भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांच्याविरुद्ध या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

ठळक मुद्देकारखान्याचे कर्मचारी, कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा केली नव्हतीमार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ काळासाठीची पीएफची १ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी

बीड :  भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले असून, पीएफच्या थकबाकी पोटी ९२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई ईपीएफओ औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयाने केली. (ank account seal of Pankaja Munde's Vaidhynath sugar factory of Pangari, Parali )  

भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांच्याविरुद्ध या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी, कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नव्हती. कारखान्याच्या ( पांगरी,परळी वैद्यनाथ, जि. बीड ) आस्थापनेची मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ काळासाठीची पीएफची १ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहाय्यक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी एस. आर. वानखेडे यांनी ही कारवाई पार पाडली. कारवाईवर समाधान व्यक्त करीत क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी सर्व भविष्य निधी थकबाकीदारांना थकीत भविष्य निधी देण्याकांचा भरणा त्वरित करण्याची सूचना केली.  

निवडणूक काळात वेतनाचाही मुद्दा राहिला चर्चेत कारखान्यातील कामगार- कर्मचाऱ्यांचा पगारही थकीत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशस्वरावर उपोषण सुरु केले होते. त्यामुळे निवडणूक आकळत कामगार-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सुरु असलेल्या उपोषणाचा मुद्दा खूप चर्चेत राहिला. आता पीएफचा प्रश्न समोर आला आहे. उर्वरित थकीत रक्कमही भरावी लागणार आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेSugar factoryसाखर कारखानेBeedबीड