लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बॅँकेत येणाऱ्या पेन्शनर व ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना सुलभ सेवा कशा मिळतील यावर आणखी भर देणार आहोत. बॅँकेत आवश्यक यंत्रणा तसेच मनुष्यबळ वाढविणार असल्याचे प्रतिपादन एसबीआय आरबीओ बीडचे एजीएम संजय चामणीकर यांनी केले.पेन्शनर्स अॅन्ड सिनिअर सिटीजन्स असोसिएशन व स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पेन्शनर्स डे कार्यक्रमात चामणीकर बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, राजुरी वेस एसबीआयचे चीफ मॅनेजर बी. श्रीनिवास, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. श्रीरंग भुतडा, डॉ. अमोल लहाने आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मराठवाडा पेन्शनर्स असोसिएश्नचे कार्याध्यक्ष भास्करराव सरदेशमुख उपस्थित होते.यावेळी धनवंतकुमार माळी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्तांसाठी पेन्शन सेल सुरु करण्यात येणार असून एक तारखेला पेन्शन देण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही दिली. इतर प्रश्न पेन्शन अदालतमध्ये सोडविले जातील असेही माळी म्हणाले. बी. श्रीनिवास यांनी आजारी पेन्शनर्स व खातेदारांना घरपोच सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला. भास्करराव सरदेशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, संघटना बळकट केल्यास सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेता येईल. पेन्श्नरांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजलगाव येथील पेन्शनर श्षख चांद पाशा यांनी संघटनेमुळे त्यांचा प्रश्न सुटल्याचा अनुभव कथन केला. प्रास्ताविक पेन्शनर्स अॅन्ड सिनिअर सिटीझन्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष अॅड. पी. ए. गोरकर यांनी केले. सूत्रसंचालन कुलदीप धुमाळे व चैतन्य यांनी केले. पद्माकर रत्नपारखी यांनी आभार मानले. यावेळी संघटनेचे सचिव डी. ए. देशपांडे, सहसचिव सुधाकर सर्वज्ञ, पद्माकरराव रत्नपारखी, पी. व्ही. कुलकर्णी, रवींद्र केंडे, प्रा. आशा पोहेकर, श्रीराम कुलकर्णी, प्रकाश चैतन्य, शेख गयासोद्दीन, डी. एस. कुलकर्णी, सय्यद अहमद, अनंतराव लांडगे, विठ्ठल राजहंस तसेच संघटनेचे पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, पेन्शनर्स व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने २५ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत देण्यात आली.
ज्येष्ठांना सुलभ सेवेसाठी बॅँक तत्पर राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:36 AM
बॅँकेत येणाऱ्या पेन्शनर व ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना सुलभ सेवा कशा मिळतील यावर आणखी भर देणार आहोत. बॅँकेत आवश्यक यंत्रणा तसेच मनुष्यबळ वाढविणार असल्याचे प्रतिपादन एसबीआय आरबीओ बीडचे एजीएम संजय चामणीकर यांनी केले.
ठळक मुद्देपेन्शनर्स डे : एजीएम संजय चामणीकर यांचे प्रतिपादन, पेन्शनर्स असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ हजारांची मदत