बीड : गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. जिल्ह्यात १३०६ ठिकाणी बाप्पांची अधिकृत परवानगी घेऊन स्थापना करण्यात आली. मात्र, यातील केवळ २१ मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. उर्वरित १२८५ मंडळांपैकी बहुतांश मंडळे आजही चोरीच्या विजेवर लाडक्या बाप्पावर प्रकाश पाडत असल्याचे समोर आले आहे. महावितरणकडून मात्र, अद्याप एकही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.लाडक्या गणरायाचे सोमवारी आगमन झाले. गणेशभक्तांनी त्यांचे जल्लोषात स्वागतही केले. १२ सप्टेंबरपर्यंत मुक्कामी असलेल्या बाप्पाला दरम्यानच्या काळात ‘विघ्न’ येणार नाही, यासाठी मंडळांनी महिन्यापासूनच तयारी केली होती. स्टेज बनविणे, विद्यूत रोषणाई, सुशोभिकरण, मंडप व इतर सर्व तयारी पूर्ण केली. बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून परिसरात विद्यूत रोषणाई केली. त्यामुळे परिसर उजळून निघाला. प्रत्यक्षात मात्र, हा झगमगाट चोरीच्या विजेवर असल्याचे समोर आले आहे. १३०६ मंडळांपैकी केवळ २१ मंडळांनी महावितरणकडून अधिकृृत वीज जोडणी घेतली आहे. १२८५ मंडळांकडे अधिकृत वीज नसल्याचे समोर आले आहे. यावरून हे मंडळे चोरीची वीज वापरत असल्याचे सांगण्यात येत आहे.महावितरणकडून मात्र, याची अद्याप ना पाहणी झाली ना तपासणी. त्यामुळे बाप्पांची वीज तोडून मंडळांचे ‘विघ्न’ अंगावर घेण्याचे धाडस महावितरणचे अधिकारी, कर्मचारी करीत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याचा फायदा मात्र मंडळांना होत आहे. त्याचबरोबर विद्युत अपघात झाल्यास नवे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
गणेशोत्सवामध्ये चोरीच्या विजेवर बाप्पांवर प्रकाशझोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 12:06 AM
गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. जिल्ह्यात १३०६ ठिकाणी बाप्पांची अधिकृत परवानगी घेऊन स्थापना करण्यात आली. मात्र, यातील केवळ २१ मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली आहे.
ठळक मुद्देकेवळ २१ मंडळांकडे अधिकृत जोडणी : १२८५ मंडळ वापरतात चोरून वीज; महावितरणकडून अद्याप एकही कारवाई नाही