लोकमत न्यूज नेटवर्कगढी : येथून जवळच निपाणी जवळका फाट्याजवळील बारमध्ये बिल मागितल्याच्या कारणावरून सात जणांनी बारमालकाला मारहाण केल्याप्रकरणी प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध मारहाण व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ऋषीकेश बेद्रे, विशाल लोणकर, केदार धुमाळ, राजेंद्र गिरे व अन्य तीन अनोळखी दारू पिले. त्यानंतर मालक माने यांनी बिल मागितल्याने त्यांना मारहाण करुन तोडफोड केली. काऊंटरमधील सहा हजार रुपये लांबविले. डीवायएसपी डॉ.अर्जुन भोसले हे तपास करत आहे.
दारूचे पैसे मागितल्याने बार चालकास बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:37 AM