बीड : जिल्ह्यातील ९० प्रकल्पामधील जलसाठा मृतावस्थेत गेला आहे. तसेच १० तलावांमध्ये पाण्याचा थेंब देखील शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे पावसाळ््याच्या तोंडावर पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले आहे.
बीड जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम, १२६ लघु असे १४४ प्रकल्प आहेत. त्यापैकी ९० प्रकल्पांचा जलसाठा मृतावस्थेत गेला आहे, तर १० प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लकच नाही. माजलगांव, मांजरा हे दोन मोठे प्रकल्प तर सिंदफणा, बिंदुसरा, बेलपारा, महासांगवी, मेहेकरी, कडा, कडी, रूटी, कांबळी, वाण, बोरणा, कुंडलीका, बोधेगाव, सरस्वती, वाघेबाभूळगांव असे १६ लघु प्रकल्प आहेत.
या सर्व प्रकल्पांच्या पाण्यावर शेती व पिण्यासाठी वापर केला जातो. जिल्ह्यात उद्योगांची संख्या कमी असल्यामुळे संपूर्ण पाणी हे शेतीसाठी व घरगुती वापरासाठी केला जातो. गत वर्षी पावसाळ््याच्या शेवटच्या दिवसांमध्ये जिल्ह्यात १०८.२ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे संपूर्ण धरणे, तलाव, तळे तुडूंब भरली होती. मात्र, यावर्षीच्या पावसाळ््याच्या सुरुवातीला या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा केवळ ६.६४ टक्के शिल्लक आहे.
जिल्ह्यातील १४४ प्रकल्पाची पाणी क्षमता ११३७ दलघमी आहे. पैकी २९३.५१६ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ५९.२५० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे व पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. तसेच अनेक गावांमध्ये सांडपाण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी गावकºयांना पायपीट करावी लागत आहे.