लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील जिल्हा कारागृहातून एका कैद्याने कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न गुरुवारी पहाटे केला होता. आरोपी पलायनासाठी कारागृहातील खुज्या भिंतीच कारणीभूत ठरत असल्याचे यावरुन समोर आले आहे. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले व भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने शुक्रवारी पत्र पाठविले आहे.
चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला ज्ञानेश्वर जाधव हा खिडकीच्या सहाय्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळील भिंतीवर चढला. तेथून तटभिंतीवर गेला व तेथून खाली उडी मारली. यात जखमी झाल्याने तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. सुदैवाने तो पोलिसांच्या हाती लागला. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर कारागृहातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी तातडीने कारागृहास भेट देऊन जबाबदार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.
दरम्यान, आरोपींनी पलायन केल्यानंतर ‘लोकमत’ने कारागृहातील सुरक्षेसंदर्भात कारागृह अधीक्षक एम. एस. पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्य प्रवेशद्वार, रिजर्व गार्ड व मुलाखत कक्ष यांच्यावरील भिंतीची उंची वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.
सध्या या भिंतीची उंची १३ ते १४ फूट असून, ती तटभिंतीएवढी म्हणजे २१ फूट करावी असे त्यांनी सांगितले. या संदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रही पाठविल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच मुख्य प्रवेशद्वार ते दुय्यम गेटवरील भिंतीची उंची वाढविण्यासंदर्भात त्यांनी सा. बां. ला कळविले आहे.सुरक्षेसाठी कर्मचारी अपुरेचार एकरात असलेल्या बीड कारागृहात ८ बराकी आहेत. याची एकूण क्षमता १६६ आहे. सद्य स्थितीत दुपटीने म्हणजे ३०२ बंदी आहेत. कारागृहाच्या सुरक्षिततेसाठी १६६ बंद्यांच्या तुलनेत पाच अधिकारी व ४३ कर्मचारी एवढे मनुष्यबळ आहे. प्रत्यक्षात मात्र बंद्यांची संख्या दुपटीने वाढली असली तरी सुरक्षेसाठी बंदोबस्त मात्र तेवढाच आहे. अपु-या मनुष्यबळावर एवढे कैदी सांभाळणे कारागृह प्रशासनासाठी कसरतीचे ठरू पाहत आहे. त्यातच पाच अधिकाºयांपैकी कारागृह अधीक्षक, तुरुंग अधिकारी, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशी तीन पदे रिक्त आहेत. ४३ पैकी २ कर्मचारी निलंबित झाल्याने ४१ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. कैद्यांची संख्या पाहता कारागृहात मनुष्यबळ वाढविण्याबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
आठ वर्षांपूर्वी तिघांनी केले होते पलायन२००९ साली तटभिंतीचा दगड काढून तीन आरोपींनी पलायन केल्याची घटना घडली होती. त्यानंतर तातडीने मजबूत व उंच अशी तटभिंत बनविण्यात आली. सध्या या तटभिंतीची उंची २१ फूट आहे.