शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

वीरशैवांचा आधारवड कोसळला; माजलगावकर महाराज शिवचरणी लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 2:08 PM

गेल्या सहासात दशकात देशातील वीरशैव समाजाच्या झालेल्या जडण घडणीत सिंहाचा वाटा उचलणार्‍या माजलगांवकर महाराजांनी वीरशैव समाजाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

ठळक मुद्देचंद्रशेखर शिवाचार्य नूतन मठाधिपती

माजलगांव :येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरू श्री. तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे आज (१० सप्टेंबर) रोजी दुपारी १ वा. वृध्दपकाळाने निधन झाले.ते. ९४ वर्षाचे होते. गेल्या एक महिन्यापासून श्री माजलगांवकर महाराज शारीरिक व्याधीग्रस्त होते. मात्र गेल्या आठ दिवसात त्यांची प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान शुक्रवारी दुपारी १ वाजता त्यांनी माजलगांव येथील मठात अखेरचा श्वास घेतला.

माजलगांवकर महाराजांच्या जाण्याने देशातील सम्रगी वीरशैव समाज शोकसारात बुडाला असून वीरशैवांचा आधारवड कोसळला असल्याची प्रितिक्रिया हिमवत्केदार महापीठाचे जगद्गुरू श्री.श्री.श्री. १००८ भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजींनी आपली शोकसंदेता व्यक्त केली. माजलगांवकर महाराजाचे निधन झाले त्यावेळी जगद्गुरू माजलगांव मठातच उपस्थित होते. महाराजांच्या प्रकृतीची चौकशी करण्याच्या निमित्ताने ते गुरूवार सायंकाळीच माजलगांवी आले होते. या वेळी श्रीगुरू देवांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर, श्रीगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज शिखर शिंगणापूरकर, अंबाजोगाईचे श्रीगुरू शंभुलिंग शिवाचार्य महाराज, पाथ्रीच्या कांचबसवेश्वर मठाचे श्रीगुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज, पूर्णा येथील श्री गुरू डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, माळकवठा येथील श्रीगुरू पंचाक्षरी शिवाचार्य महाराज यांच्या सह हजारो समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान माजलगांवकर महाराजांच्या पार्थीवावर उद्या सकाळी ११ वाजता मठाच्या आवारातच समाधीविधी करण्यात येणार आहे.

गेल्या सहासात दशकात देशातील वीरशैव समाजाच्या झालेल्या जडण घडणीत सिंहाचा वाटा उचलणार्‍या माजलगांवकर महाराजांनी वीरशैव समाजाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. दि. २ डिसेंबर १९२७ साली गुलबर्गा जिल्ह्यातील परुताबाद येथे संगम्मा व श्री शिवलिंगय्या हिरेमठ स्वामी यांच्या उुरी त्यांचा जन्म झाला. परुताबाद, सोलापूर येथे आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५४ साली माजलगांव मठाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. मठाची सूत्रे  हाती घेतल्यानंतर गेल्या सात दशकामध्ये महाराजांनी माजलगांव मठासह समग्र वीरशैव समाजाला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. औरंगाबाद, बीड, कपिलधार, बार्शी, गेवराई आदी ठिकाणी माजलगांव मठाचा विस्तार करून या मठाला धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सर्वोच्य स्थानी नेण्याची त्यांची कामगीरी नेत्रदिपक आहे.

सिध्दयोगी तपस्वी म्हणून सर्व जाती धर्मात लोकप्रिय ठरलेल्या माजलगांवकर महाराजांना त्यांचे तपःसामर्थ्य पाहुन रंभापुरी महापीठाचे तत्कालीन जगदगुरू श्री वीरगंगाधार शिवाचार्य भगवत्पाद यांनी तपोरत्नं या उपधीने गौरविले. त्याच प्रमाणे वीरशैवांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारच्या विकासातील त्यांचे अतुल्य योगदान लक्षात घेवून विद्यमान काशी जगदगुरू डॉ.श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी श्री क्षेत्र उद्धारक श्री प्रभु या उपाधीने सम्मानीत केले आहे.

चंद्रशेखर शवाचार्य नूतन मठाधिकारीवयाच्या शंभरीकडे वाटचाल करणारे माजलगांवकर महारज गेल्या एक महिन्यापासून शारीरिक व्याधीने ग्रस्त होते. गेल्या आठ दिवासात त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी श्री केदार जगदगुरू गुरुवारी दि ९ सप्टेंबर रोजी माजलगांव येथे आले असता एकुण स्थिती लक्षात घेवून माजलगांव मठाच्या उत्तराधिकार्‍याचा पट्टाभिषेक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व लगलीच शुक्रवारी सकाळी ११.०० यांच्या उपस्थितीत माजलगांव मठाचे उतराधिकारी श्री चंद्रशेखर स्वामी यांचा पट्टाभिषेक केला. मठाच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण श्री. ष.ब्र.१०८ चंद्रशेखर गुरु प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज असे करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड