बीड : स्नेह, मैत्रीचा संदेश देणाऱ्या होळीला शेकडो बीडकर कोरडा रंग खेळून जलबचतीचा संदेश देणार आहेत. अगदी विक्रेत्यांनीदेखील पाण्यात मिसळावयाच्या रंगाच्या तुलनेत कोरडा रंग मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला आहे.गुलाबी, पिवळा, हिरवा, जांभळा, शेंदरी, पांढरा असे दहा रंग बाजारात उपलब्ध आहे. या कोरड्या रंगाचे दरही अत्यंत माफक ५० ते ६० रुपये किलो इतके आहे. तर पाण्यात मिसळून वापरावयाचा रंग ५ ग्रॅम १ किलोपर्यंत पॅकिंगमध्ये आहे. याशिवाय एक रुपयापासून १० रुपयांपर्यंत पाऊच पॅकही आहे. यात गुलाबी आणि हिरव्या रंगाला मागणी आहे. १०० रुपयांपासून ३००० रुपये किलोपर्यंत दर्जानुसार रंग उपलब्ध आहे. मात्र कोरड्या रंगाच्या तुलनेत हे रंग कमीच आले आहेत. होळीनिमित्त रंगोत्सवासाठी शहरातील विविध भागात लहान - मोठ्या विक्रेत्यांनी रंग, पिचकारीची दुकाने थाटली असून ही संख्या जवळपास ६०० च्या आसपास आहे. खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू होती. यंदा जिल्ह्यात पाऊस प्रमाण अत्यंत कमी असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर न करता कोरडे रंग खेळावेत, असे आवाहन विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
बीडकर खेळणार कोरडा रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:43 AM
स्नेह, मैत्रीचा संदेश देणाऱ्या होळीला शेकडो बीडकर कोरडा रंग खेळून जलबचतीचा संदेश देणार आहेत. अगदी विक्रेत्यांनीदेखील पाण्यात मिसळावयाच्या रंगाच्या तुलनेत कोरडा रंग मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला आहे.
ठळक मुद्देबाजारात १५ टन रंगाची आवक : लाल, निळा, हिरवा, पिवळा, भगवा, गुलाबीसह दहा रंग बाजारात