- सोमनाथ खताळ
बीड : जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर रोखण्यात आरोग्य विभाग व प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. पाटोदा व अंबाजोगाई तालुक्यात मृत्यूदराचा टक्का ४ च्या पुढे सरकला असून गेवराई, केज व माजलगाव तालुक्याचाही टक्का ३ पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी चार दिवसांपूर्वीची असली तरी सोमवारी जिल्ह्यातील एकूण मृत्यूदराचा टक्का ३.०९ एवढा झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात १२ हजार ३४३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून ३८२ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. मागील सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात कोरोना मृत्यू संख्या अधिक गतीने वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. तसेच इतर जिल्ह्यातही बीडमधील रहिवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली आहे. मृत्यूदर रोखण्याचे आव्हान कायम असणार आहे
मृत्यूदर ३ टक्केहून आधिक झाला आहे, हे खरे आहे. याची कारणमिमांसा शोधली जात आहे. रुग्णसंख्या व मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात लवकरच यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. - डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
तालुकानिहाय मृत्यूदर
अंबाजोगाई ४.१८पाटोदा ४.६२गेवराई ३.३७माजलगाव ३.११केज ३.५२आष्टी २.४०धारूर २.४४परळी २.८९शिरूर १.४३वडवणी १.२८