शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

काळजी घ्या ! कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता, प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:45 AM

नवी रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूदर रोखण्यात अद्यापही प्रशासन व आरोग्य विभागाला यश आलेले दिसत नाही.

ठळक मुद्देआतापर्यंतच्या अनुभवाच्या बळावर पुढील उपाययोजनाआजही जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर ३.१४ टक्के एवढा आहे. 

बीड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाबतची स्थिती नियंत्रणात आलेली दिसत असली तरी दुसरी लाट येणाची शक्यता असल्याने भीती व्यक्त केली जात आहे. आलेल्या प्रत्येक संकटाशी दोन हात करण्याची तयारी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने दर्शविली आहे. आतापर्यंतच्या अनुभवाच्या बळावर पुढील उपाययोजना करण्यासाठी जिल्हा शासन सतर्क झाल्याचे दिसत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ४०७ संशयितांची तपासणी करण्यात आलेली आहे. यातील १ लाख २९ हजार ४१३ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, १४ हजार ९९४ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. मागील काही दिवसांची सरासरी काढली, तर दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. नवी रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूदर रोखण्यात अद्यापही प्रशासन व आरोग्य विभागाला यश आलेले दिसत नाही. आजही जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर ३.१४ टक्के एवढा आहे. दरम्यान, पहिल्या टप्यात कोरोनासंदर्भातील उपाययोजना व संकटावर मात करण्याचा अनुभव प्रशासनाला आला आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या दुसऱ्या लाटेलाही सहजपणे तोंड देण्याची प्रशासनाची तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत या लढ्याला तोंड देऊन यश संपादन करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. प्रशासन सतर्क असले तरी नागरिकांनीही संसर्ग होऊ नये आणि तो वाढू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. प्रशासनाला सहकार्य करण्यासह सूचनांचे पालन करण्याची गरज  आहे. कोविड १९ च्या नियमांचा विसर पडल्यागत नागरिक वागत असल्याने प्रशासनालाही आता कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत. नाईट कर्फ्यूची शक्यता वर्तविली जात आहे.

सामाजिक अंतर, मास्कचा वापर गरजेचाकोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी पहिल्याच सूचना वारंवार सांगून त्या अमलात आणण्यासाठी आवाहन केले जात आहे. सामाजिक अंतर ठेवणे, वारंवार सॅनिटायझर व तोंडाला मास्क लावण्याबाबत सांगितले जात आहे. सार्वजनिक कार्यक्रम कमी लोकांत घेऊन त्यात कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे, तसेच प्रशासनाने सामान्यांच्या हितासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दुसरी लाट जास्त क्षमतेने प्रभावी नसली तरी काळजी घेण्याची गरज आहे. वृद्ध व लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे.

सेंटर, डॉक्टर्स, औषधसाठा उपलब्धदुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने डॉक्टर्स, कोविड केअर सेंटर व मुबलक औषधसाठा उपलब्ध केला जात आहे. अगोदरच यंत्रणा सतर्क असली तरी त्यात आणखी वाढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ सांगतात. आरोग्य विभाग व प्रशासन याचा सामना करण्यासाठी सतर्क आहे. सेंटर, औषधसाठा, मनुष्यबळ पूर्ण आहे. आतापर्यंत दोन हात केले. यापुढेही लढण्यास तयार राहू. यात जिंकूनही दाखवू.-डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड