बीड : बील मागितल्याच्या कारणाावरून ग्राहकांनी हॉटेल मालकास बदडल्याची घटना पेठबीड भागात शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन अरूण जाधव असे मारहाण झालेल्या हॉटेलमालकाचे नाव आहे. लक्ष्मण सूर्यभान गायकवाड, नितीन चौघुले, विकास चौघुले (रा.बार्शी नाका, बीड) अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही जाधव यांच्या मालकिच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. त्यांनी जेवण केले. त्यानंतर बिलावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. याचवेळी या तिघांनी जाधव यांच्यावर काठीने हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पेठबीड ठाण्यात या तिघांविरोधात फिर्याद दिली आहे.
माजलगावातही हल्लामाजलगाव शहरातील कुरेशी गल्ली भागात राहणाºया शहनाज खदीर कुरेशी व महेबुब इसा कुरेशी पैकी महेबुब कुरेशी याने शहनाज कुरेशी यांना नालीचे पाणी त्याच्या घरात कसे काय येते, ती नाली बुजवून टाक म्हणत शिवीगाळ करुन प्राणघातक हल्ला केला. जकिरा इसा कुरेशी, इसा कुरेशी, शमीया महेबुब कुरेशी यांनीही त्यांना पाठबळ दिल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.