लोकमत न्यूज नेटवर्कबीड : एकीकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती, त्यामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. असे असले तरी आजही टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. दुष्काळचा गवगवा सुरु असतानाही बांधकामाचा सपाटा सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे. याकडे नगरपालिका व नगरपंचायतींकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाकडून पाणी आरक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पाणीप्रश्न येणाऱ्या काळात गंभीर बनू नये यासाठी उपाययोजना होत असल्या तरी दुसºया बाजूला मात्र बांधकामासाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय केला जात आहे. नगरपंचायत, नगरपालिकांकडून या बांधकामांना लगाम घालण्यासाठी कसल्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.नगररचना विभागाकडून बांधकामासाठी परवानगी घेणे अपेक्षित असते. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. विनापरवाना बांधकाम करणाºयांचे सर्वेक्षण करण्याचे काम संबंधित स्वच्छता निरीक्षकांचे असते. मात्र, त्यांच्याकडूनही याकडे कानाडोळा केला जात आहे. याचा फायदा घेत सर्रासपणे टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे येणाºया काळात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही सातत्याने होत असलेली बांधकामे त्वरित थांबवून पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.स्वच्छता निरीक्षकाच्या अहवालाची प्रतीक्षाबीड शहरासह जिल्ह्यात सर्वत्रच बांधकामे सुरु आहेत. या बांधकामासाठी परवानगी आहे का ? याची तपासणी करण्याचे काम स्वच्छता निरीक्षकांचे आहे. त्यामुळे त्यांनी याचे सर्वेक्षण करुन अनाधिकृत व पाण्याचा अपव्यय करणारी बांधकामे थांबविण्याची गरज आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बीड जिल्ह्यात दुष्काळ असतानाही बांधकामाचा सपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:12 AM
एकीकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती, त्यामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. असे असले तरी आजही टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. दुष्काळचा गवगवा सुरु असतानाही बांधकामाचा सपाटा सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे. याकडे नगरपालिका व नगरपंचायतींकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.
ठळक मुद्देपालिका, नगर पंचायतीचे सर्वांना अभय : सर्वत्र मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारतींचे बांधकाम वेगात