लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अतिशय प्रामाणिक, पे्रमळ, सुंदर आणि हुशार असलेल्या श्वान मार्शल याचे गतवर्षी निधन झाले. त्याची उणीव भरून काढण्यासाठी तेवढाच तोडीस तोड ‘चॅम्प’ हा श्वान बीड जिल्हा पोलीस दलात गुरूवारी दाखल झाला आहे. चॅम्पने प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राला पहिल्यांदाच ‘ए’ ग्रेड मिळवून दिला आहे. यामुळे बीड जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.मध्यप्रदेश राज्यातील टेकनपुर येथील सिमा सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात श्वान चॅम्प मागील काही महिन्यांपासून प्रशिक्षण घेत होता. आशिया खंडातील विविध देशातील हजारो श्वान येथे प्रशिक्षणासाठी आले होते. या प्रशिक्षणादरम्यान चॅम्पने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. स्फोटके शोधून त्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याबद्दल त्याला ‘ए’ ग्रेड देण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात पहिल्यांदाच श्वानाला ‘ए’ ग्रेड देण्यात आला आहे.बीड पोलीस दलात सहा श्वान कार्यरतसध्या बीड जिल्हा पोलीस दलात सहा श्वान कर्तव्य बजावत आहेत. गुन्हे शोधणे, स्फोटके शोधणे, अंमली पदार्थ शोधण्याचे काम ते करीत आहेत. वयाने सर्वात मोठा ‘डॉन’ असून सर्वात छोटा ट्रेनिंगसाठी गेलेला ‘मार्शल’ आहे.पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणीच श्वानांसाठी स्वतंत्र खोली देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. उन्हाळ्यात श्वानांना त्रास होणार नाही, यासाठी प्रत्येक कॅनलमध्ये पंखा आहे. त्यांना गरमी अथवा इतर कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.श्वानांचा दैनंदिन कार्यक्रमपहाटे ५ ला उठणे. शौचालयासाठी नेणे. त्यानंतर किमान १० कि.मी.पर्यंत त्यांचा सराव करून घेणे. ९ वा.परत आल्यावर नाष्ता, पाणी. नंतर आराम. दुपारी जेवण. सायंकाळी ४ वा. पुन्हा सरावासाठी मैदानावर. ६ वा. पुन्हा जेवण आणि नंतर आराम, असा त्यांचा दैनंदिन कार्यक्रम आहे.