शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
2
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
3
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
4
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
5
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
6
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
7
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
8
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
9
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
10
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
11
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
12
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
13
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
14
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
15
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
16
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
17
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
18
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
19
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
20
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा

बीडच्या विमानतळास १२ वर्षांपूर्वी लागणार होते ५० लाख, आता लागतील ५० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 19:40 IST

वर्ष २०११-१२ मध्ये विमानतळाबाबत तत्त्वत: मंजुरी देऊन ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्याचे ठरविण्यात आले होते. सध्या यासाठी ५० कोटींची तरतूद लागणार असल्याचे प्रस्तावात नमूद आहे.

- शिरीष शिंदेबीड : बीडच्याविमानतळास २०११-१२ मध्ये तत्त्वत: मंजुरी मिळाली होती, त्यावेळी ५० लाख रुपयांची तरतूद करण्याचे ठरले होते; मात्र त्यानंतर याबाबत काहीच निर्णय झाला नव्हता. तब्बल १२ वर्षांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये विमानतळ होणार असल्याची घोषणा केली. २०११-१२ मध्ये विमानतळ कामास ५० लाख रुपयांची तरतूद अपेक्षित होती; पंरतु आता ५० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. म्हणजेच भूसंपादन १०० पटींनी वाढले आहे.

बीड येथील ३० जानेवारी रोजी झालेल्या ‘डीपीसी’च्या बैठकीत पालकमंत्र्यांनी विमानतळाबाबत सकारत्मकता दाखवली होती. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने नवीन विमानतळ उभारणीसाठीचा प्रस्ताव मंत्रालयास सादर केला. एमएडी कंपनीचे महाव्यवस्थापक आर. पी. चाऊल यांनी नवीन विमानतळासाठी १३५ हेक्टर जागेची आवश्यकता असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार बीड तालुक्यातील शहाजानपूर (लिंबा) येथे एकूण १५३.५७ हेक्टर जमीन उपलब्ध असल्याचे नमूद केले. तसेच विमानतळासाठी एकूण प्रस्तावित क्षेत्र अंदाजित २५०० मीटर लांबी व १५०० मीटर रुंद असे १५३.५७ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी शासकीय गायरान जमीन १० हेक्टर ६९ आर, तर उर्वरित १४२.८८ हेक्टर आर खासगी संपादित करावी लागणार आहे. खासगी भूसंपादनासाठी अंदाजित प्रतिहेक्टरी ६ लाख याप्रमाणे अंदाजित ४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये विमानतळ होणार असल्याची घोषणा विधिमंडळात सोमवारी केल्याने या कामास आता गती मिळणार आहे.

२०११-१२ मध्ये तत्त्वत: मंजुरीसार्वजनिक उपक्रम मंत्री तथा बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली २७ जानेवारी २०११ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. जिल्ह्यामध्ये उद्योगधंद्यांची भरभराट व्हावी, गतिमानता वाढावी, यासाठी बीड येथे विमानतळ करण्याबाबत तत्त्वत: मंजुरी बैठकीत देण्यात आली होती. वर्ष २०११-१२ मध्ये विमानतळाबाबत तत्त्वत: मंजुरी देऊन ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्याचे ठरविण्यात आले होते. सध्या यासाठी ५० कोटींची तरतूद लागणार असल्याचे प्रस्तावात नमूद आहे.

विजयसिंह पंडित यांच्या मागणीला यशआमदार विजयसिंह पंडित यांनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीड येथे नवीन विमानतळ उभारणीची मागणी केली होती, त्यांच्या मागणीला यश आले. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आ. विजयसिंह पंडित यांच्या मागणीचा उल्लेख करून विधानसभेत बीड येथे नवीन विमानतळ उभारण्याची घोषणा केली. यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असून, जिल्ह्यातील उद्योगवाढीला मोठा फायदा होणार आहे.

टॅग्स :BeedबीडAirportविमानतळAjit Pawarअजित पवार