बीड : जिल्ह्यातील ५६ शिक्षकांना अखेर मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाली. दोन दिवसांपूर्वी मुख्याध्यापकपदी पदोन्नतीसाठी सुमपदेशनाची प्रक्रिया होणार होती. मात्र आक्षेप, हरकतींमुळे तसेच शासनाचे निर्देश यामुळे पेच निर्माण झाला होता. त्यामुळे ही प्रक्रिया दोन दिवस पुढे ढकलली होती. बुधवारी पारदर्शी निवड प्रक्रिया पार पडली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापक पदासाठी पदोन्नती समुपदेशन प्रक्रिया बुधवारी स्काऊट भवनमध्ये मुख्याध्यापक समुपदेशनासाठी इच्छुक शिक्षकांना बोलावले होते. यावेळी सभागृहात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सविता गोल्हार, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड आदी उपस्थित होते.पदोन्नती समुपदेशनासाठी ज्येष्ठता यादीवर आलेल्या सर्व आक्षेपांचा विचार करण्यात आला. मुख्याध्यापक पदोन्नती पारदर्शीपणे व्हिडीओ चित्रणात पार पडली. या प्रक्रियेत एकूण ५६ मुख्याध्यापक निवडण्यात आले. १३१ पैकी ५१ जणांनी आजारपणाचे तसेच इतर कारण सांगून पदोन्नतीला नकार दिला. २० जण अनुपस्थित राहिले. ४ शिक्षकांनी विभागीय चौकशी सुरु असल्यामुळे पदोन्नती नाकारली. तसेच अनुपस्थित शिक्षकांचाही नकार समजण्यात आला. नकार दर्शविणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णयाप्रमाणे पुढील तीन वर्ष पदोन्नती मिळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच प्रशासनाकडे सादर केलेली माहिती चुकीची असल्यास कारवाईचे संकेतही देण्यात आलेले आहेत. यावेळी उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, गौतम चोपडे, तुकाराम पवार, भगवान सोनवणे, सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक गिरीश बिजलवाड, संगणक चालक, अविनाश गजरे, दत्तात्रय मोकाडे, तुषार शेलार, मनोज लोखंडे, दिलीप पुल्लेवाड, विनोद साळवेसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.‘उर्दू’ची पदोन्नती शुक्रवारीमराठी माध्यमाच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर उर्दू माध्यमाच्या १० जागांवर शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती समुपदेशन होणार असल्याचे समजते.
बीड जिल्हा परिषदेचे ५६ शिक्षक बनले हेडमास्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:10 AM
जिल्ह्यातील ५६ शिक्षकांना अखेर मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाली. दोन दिवसांपूर्वी मुख्याध्यापकपदी पदोन्नतीसाठी सुमपदेशनाची प्रक्रिया होणार होती.
ठळक मुद्देमुख्याध्यापक पदोन्नती समुपदेशन : ५५ जणांचा नकार, २० अनुपस्थित; चित्रीकरणामध्ये पारदर्शक प्रक्रिया