बीड : सजविलेले पाळणे... कन्यारत्नांच्या मातांचे फेटे घालून झालेले स्वागत... अशा थाटात एकाच वेळी येथे तब्बल ८३६ कन्यारत्नांचा सामूहिक नामकरण सोहळा रविवारी थाटात पार पडला. मुलगी जगली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे, हा उद्देश ठेवून स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले. राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात आरोग्य विभागाच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला.बीड जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण मोठे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने मोहीम राबविली आहे. सोहळ््याची ‘वंडर बुक आॅफ रेकॉर्ड’ या लंडनस्थित आंतरराष्ट्रीय संस्थेसह गोल्डन बुक आॅफ रेकार्ड या संस्थेने नोंद घेतली. वंडर बुक रेकॉर्डचे भारतातील हैदराबाद येथील समन्वयक डॉ. स्वर्ण श्री गुराम उपस्थित होते. मुलींचा जन्मदर वाढविण्याबरोबरच आरोग्य सेवा बळकट केल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना खटोड प्रतिष्ठाणच्या वतीने ‘सेवा गौरव’ पुरस्कार देण्यात आला. रोख एक लाख रूपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे. डॉ. थोरात यांनी रोख रक्कम रूग्णसेवेसाठी समर्पित केली.खा. डॉ. प्रितम मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्येचा बदनामीचा डाग धुवून काढण्यापासून ते स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करत आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून ओळख झाली आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सर्वच घटक जागरुक आहेत.>मातांचाही सन्मानमुलींच्या सामूहिक नामकरण सोहळ्यात त्यांच्या मातांना फेटा बांधण्यात आला होता. मातांचा साडी-चोळी भेट देवून हळदी-कुंकू करत सत्कार करण्यात आला. मुलींना पाळणा, कपडे, ड्रायफूड, घुगऱ्या, खेळणी भेट देण्यात झाली.
बीडमध्ये ८३६ कन्यारत्नांचा सामूहिक नामकरण सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 5:12 AM