बीड : जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे व छायाचित्रे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केले पाहिजे आणि पीकनिहाय नुकसानीची माहिती येणा-या दोन दिवसात युद्धपातळीवर पूर्ण करुन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना गुरुवारी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, नामदेव टिळेकर, शोभा ठाकूर, शोभा जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी गिरी आणि सर्व तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याबाबत यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही केली जावी. तसेच कालमयार्देत काम पूर्ण करावे यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी सुनिश्चित पद्धतीने काम करावे. कोणतीही अडचण उद्भवल्यास त्याबाबत वरिष्ठ पातळीवरून तातडीने मार्गदर्शन मिळवून मार्ग काढावा.जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती वेळेत पूर्ण केल्यास जिल्ह्यातील शेतक-यांना यातील मदत देणे शक्य होणार आहे, संबंधित अधिकाºयांनी गावनिहाय यादीप्रमाणे सर्व माहिती तयार करुन माहितीचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. त्यानंतर पाण्डेय यांनी जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेतला. तसेच प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना दिले. यामध्ये जलयुक्त शिवार, कृषी, नगरपालिका, जिल्हापरिषद, पाणीपुरवठा यासह विविध विभागांच्या योजनांचा समावेश होता.
बीड जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विविध विभागातील कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:31 PM
पीकनिहाय नुकसानीची माहिती येणा-या दोन दिवसात युद्धपातळीवर पूर्ण करुन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना गुरुवारी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.
ठळक मुद्देपंचनामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना : शहरातील कचरा व्यवस्थापन, रस्ता दुरुस्तीसंदर्भात दिले आदेश