बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे मात्तबर नेते राजकिशोर मोदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 01:01 PM2021-10-10T13:01:12+5:302021-10-10T13:03:50+5:30

राजकिशोर मोदी यांनी बीड जिल्ह्यात कुठेही काँग्रेसची सत्ता नसतांना नगर परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवली व अंबाजोगाई काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला निर्माण केला.

beed congress: Congress leader Rajkishore Modi likly to join NCP befor dasera | बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे मात्तबर नेते राजकिशोर मोदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे मात्तबर नेते राजकिशोर मोदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

googlenewsNext

अंबाजोगाई: स्वकर्तुत्वावर अंबाजोगाई नगर परिषद २० वर्षांपासून आपल्या ताब्यात ठेवणारे आणि गेल्या ३० वर्षांपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात आपले राजकीय वलय निर्माण करणारे अंबाजोगाईचे नगराध्यक्ष तथा बीड जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकिशोर मोदी हे काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. दसऱ्यापूर्वीच त्यांचे सीमोल्लंघन होणार असल्याची चर्चा राजकीय गोटात चर्चिली जात आहे.

राजकिशोर मोदी यांची सहकार, शिक्षण माध्यमातून ओळख सर्वदूर झाली आहे. काँग्रेस पक्षात मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, कॉटन फेडरेशन व काँग्रेस पक्षातील विविध पदांवर त्यांनी काम केले. महाविद्यालयीन जीवनापासून ते काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. बीड जिल्ह्याची काँग्रेस जिवंत ठेवण्याचे काम मोदींनी केले व पक्षश्रेष्ठींनी बीड जिल्ह्याच्या काँग्रेसची धुरा त्यांच्यावर सोपविली. केज विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने आमदारकीची संधी मोदींना उपलब्ध होणार नाही. गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात काम करणाऱ्या मोदींना विधान परिषदेची संधी दोन वेळा  उपलब्ध झाली होती. मात्र दोन्ही वेळी ही संधी हुकली.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचे अनेक मातब्बर नेते असले तरीही काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी कोणाचेही योगदान फुलले नाही. मात्र, राजकिशोर मोदी यांनी बीड जिल्ह्यात कुठेही काँग्रेसची सत्ता नसतांना नगर परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवली व अंबाजोगाई काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला निर्माण केला.बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षात खा.रजनी पाटील यांचा राजकीय अडसर व काँग्रेस पक्षात राहूनही आपली विधानपरिषदेची इच्छापूर्ती पूर्ण होत नसल्याने मोदी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत.मुबंईत जाऊन त्यांनी राष्ट्रवादी चे सर्वोसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली असल्याचे समजते.या भेटीतूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट निवडली असावी.

बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोदी यांच्यासारख्या नेत्रत्वाची गरज होती. आगामी नगरपालिकेच्या निवडणुका,सहकारात मोदींचे असलेले मोठे अस्तित्व या सर्व बाजु राष्ट्रवादीला जमेच्या ठरतील व एक नवा चेहरा पक्षाला मिळेल या उद्देशाने शरद पवार यांनी पूर्वीच मोदींना हेरले होते. मात्र मोदी ही योग्य वेळेची वाट पहात असावेत. एकंदरीत दसऱ्यापूर्वीच मोदींचे सीमोल्लंघन होणार असल्याचा चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: beed congress: Congress leader Rajkishore Modi likly to join NCP befor dasera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.