Beed Crime News ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील गुन्हांची प्रकरण संपता संपत नाहीत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गुंड सतीश भोसले हा एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यामुळे बीडच्यागुन्हेगारीची चर्चा पुन्हा एकदा राज्यभर सुरू झाली आहे. सतीश भोसले या तरुणाने कैलास वाघ या व्यक्तीला मारहाण केल्याचे समोर आले. दरम्यान, आता कैलास वाघ यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी सतीश भोसले याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबईतील पोलिसाने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला अखेरचा मेसेज, "तू त्यांना सोडू नकोस..."
हे प्रकरण आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उचलून धरले आहे. त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात आला आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव कैलास वाघ असं आहे. वाघ यांनी सतीश भोसले याच्यावर आरोप केले आहेत.
पीडित व्यक्तीचे आरोप काय?
कैलास वाघ म्हणाले, बीड जिल्ह्यातील सतीश भोसले याच्या परिचयातील व्यक्तीकडे पोकलेन ऑपरेटर म्हणून कामाला होतो. मी त्यांच्याकडे कामाला होतो, माझे त्यांच्याकडे पैसे होते. त्यांनी माझे पैसे दिले नाही. मी त्यांना तुमच्याकडे कामाला रहायचे नाही असे सांगितले.त्यांनी मला माझ्या गावातून उचलून घेऊन गेले आणि मारहाण केली. मला ते अजूनही धमकी देत आहेत, असा गंभीर आरोप वाघ यांनी केला.
"सतीश भोसले माझ्या ओळखीचे नाहीत. त्यांनी मला काम का सोडले म्हणून मारहाण केली. माझ्या नावावर खोटी केस टाकण्याची धमकी दिली. मला मारहाण होऊन आज दीड वर्षे झाली आहेत. हा व्हिडीओ कोणी केला मला माहित नाही, असंही वाघ म्हणाले.