बीड : सुरूवातीला झालेल्या रिमझिम पावसावरच शेतकऱ्यांनी यावर्षी पेरण्या केल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ३ लाख ४७ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली असून त्यापाठोपाठ सोयाबीनला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. कृषी विभागाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.बीड जिल्ह्यात ७ लाख २७ हजार ५२७ हेक्टरवर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यामध्ये आतापर्यंत ७ लाख १५ हजार ९१५ हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. याची टक्केवारी ९८.४० टक्के एवढी आहे. यावर्षी उशिरा पेरणीला सुरूवात झाली. जिल्ह्यात अद्यापही शेतकरी समाधानी होईल, असा पाऊस झालेला नाही. ज्यांनी पेरण्या केल्या आहेत, ते शेतकरीही आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जलसाठेही कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे दोन दोन पानावर आलेली पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. ही पिके जगवायची कशी, असा प्रश्न जिल्ह्यातील सर्वच शेतकºयांसमोर आहे.सोयाबीनचा पेरा २ लाख १६ हजार हेक्टरजिल्ह्यात सोयाबीनचे १ लाख १९ हजार ५१४ एवढे सर्वसाधारण क्षेत्र आहे. जवळपास १८१ टक्के सोयाबीनचा पेरा म्हणजेच २ लाख १६ हजार ७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.तसेच ४९ हजार ४०५ हेक्टरवर तूर, १२ हजार १०४ हेक्टरवर मूग, १५ हजार ३५ उडीद, ५२ हजार ४२३ हेक्टर बाजरी, ९ हजार ११८ मका, ३ हजार ३४२ हेक्टर भुईमूग, १८४२ हे. तीळाची पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे.
बीड जिल्ह्यात खरिपाची ९८ टक्के पेरणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:14 AM
सुरूवातीला झालेल्या रिमझिम पावसावरच शेतकऱ्यांनी यावर्षी पेरण्या केल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
ठळक मुद्देकृषी विभागाची माहिती : दमदार पावसाची प्रतीक्षा