शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बीड जिल्हा बॅँकेच्या संचालकांना मिळाली तीन महिने मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:04 AM

येत्या काही महिन्यात होणारी बीड जिल्हा बॅँकेची निवडणूक आता तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने या संदर्भात २७ जानेवारी रोजी निर्णय जारी केला आहे.

बीड : येत्या काही महिन्यात होणारी बीड जिल्हा बॅँकेची निवडणूक आता तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने या संदर्भात २७ जानेवारी रोजी निर्णय जारी केला आहे.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या २०२०-२५ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक अपेक्षित होती. या निवडणुकीच्या अनुषंगाने ३१ जानेवारीपर्यंत प्राथमिक मतदार यादी कार्यक्रम जाहीर होता. तर बॅँकेच्या सभासद संस्थांकडून उमेदवार, मतदार, सूचक, अनुमोदक होण्यासाठी प्रतिनिधी म्हणून ठराव मागविण्यात आले होते. दरम्यान जिल्हा बॅँकेची निवडणूक आता तीन महिने पुढे ढकलण्यात आल्याने विद्यमान संचालकांना दिलासा मिळाला आहे.राज्यातील ३१ पैकी ३२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँका, २१ हजार २२५ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांपैकी ८ हजार १९४ संस्थांच्या निवडणूका मुदत संपण्यापूर्वी घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ घोषित केलेली आहे. या प्रक्रियेत पोर्टलवर माहिती अपलोड करणे, बॅँकांना शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करणे, तसेच अनुषंगिक माहिती संकलन करणे आदी कार्यवाहीसाठी सहकार विभागाचे जिल्हास्तरीय क्षेत्रिय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व त्यांचे क्षेत्रिय अधिकारी व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी समांतर पध्दतीने राबविताना व्यत्य येण्याची शक्यता निर्मार झाली आहे. संचालक मंडळाची निवडणूक ही वैधानिक जबाबदारी असल्याने मर्जमाफी योजना अंमलबजावणीस विलंब लागू शकतो. त्यामुळे पुढील हंगामासाठी कर्जवाटपाच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर शासनाने ज्या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशपत्र स्वीकारणे सुरु झालेले आहे, अशा संस्था वगळून राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी कॅँका व प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांच्या निवडणुका एका आदेशानुसार तीन महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याबाबत निर्णय जारी केला आहे.भाजपाचे वर्चस्व : राष्टÑवादीचे तीन संचालकबीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक सध्या भाजपच्या ताब्यात आहे. भाजपचे १८ तर राष्टÑवादी कॉँग्रेस गटाचे तीन संचालक आहेत. आता कर्जमाफी योजनेचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यानंतर जिल्हा बॅँक निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकेल, असा अनुमान आहे.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्रBJPभाजपा