लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १८ कोटी ५१ लाख रुपये एवढा नफा झाला आहे. बँक सक्षम होत असल्याचे या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल, असे बँकेचे अध्यक्ष आदित्य सुभाषचंद्रजी सारडा यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले.बँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्ह्यातील मान्यवर नेते, सभासद, शेतकरी व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. अध्यक्षस्थानावरु न बोलतांना आदित्य सारडा यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला.या सभेस जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, उपाध्यक्ष गोरख धुमाळ, संचालक साहेबरावजी थोरवे, सत्यभामा बांगर, महादेव तोंडे, मीना राडकर, दिनेश परदेशी, वसंतराव सानप, बी.एस.फासे, तसेच सभासद पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.गौरवाची बाब : बँकेस ‘ब’ वर्ग दर्जा, सक्षमतेकडे वाटचालते म्हणाले की, बँकेकडे वसुल भागभांडवल ५७ कोटी ८५ लाख रुपये असून ठेवी ५४४ कोटी २५ लाख रुपये, बँकेची गुंतवणुक १७३ कोटी ९२ लाख रुपये तर कर्जे १०९१ कोटी ८५ लाख रुपये एवढे आहे.बँकेस १८ कोटी ५१ लाख रुपये एवढा नफा झालेला आहे. या आकडेवारीवरून बँक सक्षम होत आहे, असे निदर्शनास येते.बँकेचे नाबार्ड व्दारा वैधानिक लेखापरिक्षण झालेले असून त्यामध्ये बँकेस ‘ब’ दर्जा प्राप्त झालेला आहे. ही बँकेसाठी गौरवाची बाब आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे संचालक मंडळ हे बँकेच्या उन्नतीकरिता सदैव प्रयत्नशील आहे हे यावरु न स्पष्ट होईलच, असे आदित्य सारडा म्हणाले.
बीड जिल्हा बँकेस १८ कोटी ५१ लाख रुपयांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:17 AM
येथील दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १८ कोटी ५१ लाख रुपये एवढा नफा झाला आहे. बँक सक्षम होत असल्याचे या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल, असे बँकेचे अध्यक्ष आदित्य सुभाषचंद्रजी सारडा यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले.
ठळक मुद्देआदित्य सारडा : ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा