बीड : भाजपा युतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून ओबीसी समाजाला घटनेनुसार मिळणा-या सर्वच हक्कांपासून वंचित ठेवण्यात आलेले असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, जातीनिहाय जनगणना, उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा, मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती, स्वाधार योजना आदी प्रश्नांवर विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी विद्यार्थ्यांसह समाजबांधवांचा मोर्चा काढण्यात आला.ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणा-यांना समाज कधीच माफ करणार नाही. ओबीसींना हक्कापासून वंचित ठेवणा-या सरकारला ओबीसी समाज सत्तेपासून वंचित करील असे प्रतिपादन ओबीसी हक्क मोर्चाचे आयोजक, अ.भा. समता परिषदेचे विभागीय तथा बीड जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांनी केले.आचार संहितेच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडणाºया सरकारने ओबीसी समाजाला गेल्या चार वर्षात काहीच दिले नसल्याची खंत ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी मोर्चाला मार्गदर्शन करतांना व्यक्त केली.ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, जातीनिहाय जनगणनना झालीच पाहिजे, जय ज्योती जय क्रांती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर झालेल्या सभेत मल्हार सेनेचे इंजि. विष्णू देवकते, सोनार समाजाचे अॅड. संदीप बेदरे, विद्यार्थी प्रतिनिधी नम्रता ठोंबरे, कुंभार समाजाचे अर्जुन दळे, भारती फुलेकर, सामाजिक कार्यकर्ते जे.डी. शाह, आयोजक अॅड. सुभाष राऊत, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ आदींची समयोचित भाषणे झाली.व्यासपीठावर नाभिक समाजाचे विक्र म बिडवे, सोनार समाजाचे मंगेश लोळगे, परिट समाजाचे गणेश जगताप, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर, मुंबईचे माजी नगरसेवक रविंद्र पवार, धनंजय वाघमारे, मुकेश शिवगण आदींची उपस्थिती होती. मोर्चात बीड जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थी, युवक,युवती, महिला,पुुरु ष हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
बीड जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला ओबीसींचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:10 AM
ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणा-यांना समाज कधीच माफ करणार नाही. ओबीसींना हक्कापासून वंचित ठेवणा-या सरकारला ओबीसी समाज सत्तेपासून वंचित करील असे प्रतिपादन ओबीसी हक्क मोर्चाचे आयोजक, अ.भा. समता परिषदेचे विभागीय तथा बीड जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांनी केले.
ठळक मुद्देहक्कावर गदा आणणाऱ्यांना ओबीसी समाज कदापि माफ करणार नाही : सुभाष राऊत