बीड : विविध कारणांमुळे किडण्या निकामी झाल्यास डायलेसिस केले जाते. मात्र, यंत्र अपुरे असल्याने अनंत अडचणी येत होत्या. आता आणखी चार यंत्रण जिल्हा रूग्णालयाला मिळाले आहेत. ते यंत्र रूग्णांच्या सेवेसाठी कार्यान्वितही केले आहेत.मे अखेरपर्यंत २ हजार ५६० रूग्णांना या डायलेसिसमुळे जीवदान मिळाले होते. बीडचा डायलेसिस विभाग मराठवाड्यात अव्वल आहे.साप चावलेले, मधुमेह, लठ्ठपणा, जळालेले, विष प्राशन केलेले, विविध अपघातांत जखमी झालेले या सारख्या विविध कारणांमुळे मनुष्याच्या किडन्या निकामी होतात. त्या वेळी शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे कार्य डायलेसिसद्वारे केले जाते.ही मशीन रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविते. किडनीसारखेच कृत्रिमरीत्या हे मशीन काम करते.आतापर्यंत जिल्हा रूग्णालयात चारच यंत्र कार्यान्वित होते. आता आणखी चार यंत्र मिळाले आहेत. यामुळे रूग्णांना तात्काळ, दर्जेदार, वेळेवर सेवा मिळणार आहे. तसेच रूग्णसंख्याही वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.या विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.हुबेकर, डॉ.आय. व्ही. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मनोज मुंडे, डॉ.बडे, प्रमुख स्वाती माळी, परिचारिका उज्ज्वला खिल्लारे, टेक्निशियन किशोर धुणगव, वसंत घुले, प्रीती कुलकर्णी, सेवक माने हे काम करतात. मराठवाड्यात बीडच्या टीमचे काम अव्वल असल्याचे सांगण्यात आले.आतापर्यंत चार मशीन उपलब्ध होत्या. आता आणखी चार मशीन आल्या आहेत. त्या कार्यान्वितही केल्या आहेत. यामुळे रूग्णांना सेवा देण्यात मोठा हातभार लागणार आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्नही मार्गी लावला जाईल.- डॉ.अशोक थोरातजिल्हा शल्य चिकित्सक, बीड
बीड जिल्हा रुग्णालयाला मिळाली आणखी चार ‘डायलेसिस’ यंत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:41 PM
विविध कारणांमुळे किडण्या निकामी झाल्यास डायलेसिस केले जाते. मात्र, यंत्र अपुरे असल्याने अनंत अडचणी येत होत्या. आता आणखी चार यंत्रण जिल्हा रूग्णालयाला मिळाले आहेत.
ठळक मुद्देसुविधांमध्ये वाढ : आता ८ यंत्रांद्वारे उपचार