बीड : लक्ष्य उपक्रमात सहभाग नोंदवून यश संपादन करण्यासाठी जिल्हा रूग्णालयाची धडपड सुरू आहे. सोमवारी राष्ट्रीय मुल्यांकन समितीने प्रसुती विभाग व शस्त्रक्रिया गृहाची तपासणी केली. दोन दिवस ही समिती बीडमध्ये मुक्कामी आहे.
आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाकडून लक्ष्य उपक्रम राबविला जातो. ज्या रूग्णालयांनी सहभाग नोंदविला आहे, अशा रूग्णालयांची जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय समितीकडून तपासणी केली जाते. प्रसुती विभागाची स्थिती, सुविधा तसेच माता शस्त्रक्रिया गृहांची अवस्था आणि सुविधांची बारीक माहिती घेतली जाते. यात पात्र ठरल्यावर ३ लाख रूपयांचा निधी बक्षिस म्हणून देण्याची प्रक्रिया आहे.
दरम्यान, गुरूवारी सकाळीच समिती बीडमध्ये दाखल झाली. डॉ.जागृती बहुगुणा, सुनिलकुमार शर्मा या दोन सदस्यांनी दिवसभर जिल्हा रूग्णालयाची तपासणी केली. सोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, डॉ.सुखदेव राठोड, डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.सितांबरी गव्हाणे, बापू निकाळजे यांच्यासह डॉक्टर, परिचारीका उपस्थित होत्या.
गेवराई उपजिल्हा रूग्णालय बाकीनेकनूर स्त्री रूग्णालय आणि केज व परळी उपजिल्हा रूग्णालयाची यापूर्वीच तपासणी झालेली आहे. गुरूवारी जिल्हा रूग्णालयाची तपासणी झाली. आता केवळ गेवराई उपजिल्हा रूग्णालयाची तपासणी बाकी आहे. लवकरच याचाही कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.
लक्ष्य उपक्रमात सहभाग नोंदविला होता. राष्ट्रीय समितीकडून तपासणी केली जात आहे. यात आम्ही नक्कीच यश संपादन करून- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड