बीड जिल्ह्यात ३० व ३१ ऑगस्ट या कालावधीत ३३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले होते. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी गेवराई तालुक्यातील अनेक गावांत अतिवृष्टी झाली. गोदावरी नदीकाठावरील शनीच्या साडेतीन पीठांपैकी एक मुख्य पीठ तीर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनी महाराज मंदिर व तीर्थक्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर दत्त मंदिर पाण्याखाली गेले. तर तालुक्यातील अमृता, सिंदफणा, विद्रूपा, कापशीसह इतर नद्यादेखील दुथडी भरून वाहत होत्या. तर दरवर्षी टंचाईचा सामना करणाऱ्या आष्टी तालुक्यानेहीही पावसाचे रौद्ररूप अनुभवले. धामणगाव हायवे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. जोरदार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून महसूल विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्याला चार दिवसांत दोन वेळा अतिवृष्टीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:37 AM