लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजाराची मदत तात्काळ देण्यात यावी, तसेच बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी संपूर्ण जिल्हाभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड, अंबाजोगाई, गेवराई, माजलगाव, केज, तसेच लिंबागणेश येथील महार्गावर शेतकºयांनी आंदोलन केले. यावेळी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. पाऊस नसल्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करुन तात्काळ मदत जाहीर करावी, तसेच शेतीमालाची हमी भावाने खरेदी करावी, व हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.या आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन शांततेत चालू असताना, पोलिसांकडून मात्र ते दडपण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न कोणाच्या सांगण्यावरुन केला हे त्यांनी सांगावे, २७ आॅक्टोबरपर्यंत शेतकºयांना ५० हजार रुपयांची मदत दिली नाही, तर मोठे आंदोलन उभरण्याचा इशारा यावेळी करपे यांनी दिला.लिंबागणेश येथे रस्ता रोकोबीड : तालुक्यातील लिंबागणेश येथे वरील मागण्यांसाठी रास्तारोको करण्यात आला, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, धनंजय मुळे, विकास चव्हाण, अण्णा शेळके, दादासाहेब शेळके, भारत मुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.माजलगाव परभणी फाटायेथे रास्ता रोकोमाजलगाव : येथील परभणी चौकात चक्काजाम आंदोलन झाले. दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांच्या जनावरांना दावणीला चारा पाणी द्या, बोंड अळीचे पैसे तात्काळ द्या, सरसगट कर्जमाफी देण्यात यावी, या सह विविध मागण्यांसाठी २ तास रस्ता रोको करण्यात आला. मागण्याचे निवेदन संबधित अधिकाºयांना दिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमित नाटकर, अशोकराव नरवडे पाटील, लिंबाजी लाखे, शाकेर पटेल, उद्धवराव साबळे, प्रदीप शेजूळ व इतर शेतकरी उपस्तीत होते.म्हसोबा फाटा नगर रोडबीड : शहराजवळील म्हसोबा फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष राजू गायके यांच्या अध्यक्षतेखाली चक्काजाम आंदोलन झाले. यावेळी अर्जून सोनवणे, नितीन लाटे, वसंत गायके, आदी उपस्थित होते. आंदोलनामुळे कल्याण- विशाखापट्टणम् तसेच सोलापूर- धुळे राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती.तलवाडा फाटा येथे चक्काजाम आंदोलनगेवराई : तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन, पाणी टंचाई असणाºया भागात टँकरने पाणी पुरवठा करावा या व इतर मागण्यासाठी तलवाडा फाटा येथे अर्धा तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डाके, मच्छिंद्र गावडे, भाऊसाहेब वळकुंडे, राजेश यादव, बदाम येवले, मनोज येवले, गोकुळ मेटे, नीलेश यादव, सोमनाथ जावळे, नारायण कनसे, बळीराम शिंदे, सुदाम चव्हाण, किसन भुसे, भारत सुखदेव, डिगांबर आहेर, डिगांबर पठाडे, नारायण सुखदेव, दादासाहेब आहेर आदी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चा चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:12 AM
जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजाराची मदत तात्काळ देण्यात यावी, तसेच बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी संपूर्ण जिल्हाभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देशेतकरी उतरले रस्त्यावर : हमीभावासह हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी