लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बालमृत्यू व गर्भवती माता मृत्यू रोखण्यासाठी तसेच सशक्त पिढीच्या निर्माणासाठी जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सुमारे ७ लाख ३० हजार २४० लाभार्थ्यांना लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले.राज्यात गोवर व रुबेला लसीकरणाची मोहीम राबविली जात आहेत. २६ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार असून २७ नोव्हेंबरपासून बीड जिल्ह्यात ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, आरोग्य उपसंचालक माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा शल्य चित्किसक डॉ. अशोक थोरात, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड, उपशिक्षणाधिकारी नजमा आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ह्यूमन डेव्हलपमेंट इनडेक्समध्ये सुधारणेसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, बालकल्याण विभाग, रोटरी, लॉयन्स क्लब आदी सेवाभावी संस्था, बालरोग तज्ज्ञांसह संपूर्ण मनुष्यबळ तयार ठेवले आहे. २७ नोव्हेंबरपासून दीड महिना ही मोहीम सुरु राहील. पालकांनी तसेच सर्व घटकांनी ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिंह तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.थोरात, अ. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कदम यांनी गोवर आणि रुबेला लसीकरणासाठी केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.
बीड जिल्ह्यात ७ लाख बालकांना गोवर, रुबेला लस देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:12 AM
बालमृत्यू व गर्भवती माता मृत्यू रोखण्यासाठी तसेच सशक्त पिढीच्या निर्माणासाठी जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सुमारे ७ लाख ३० हजार २४० लाभार्थ्यांना लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले.
ठळक मुद्देमोहीम यशस्वी करा : जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांचे आवाहन ; ९ ते ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना होणार लाभ